Top news महाराष्ट्र मुंबई

महाविकास आघाडी सरकार सध्या स्थिर आहे पण….- सुधीर मुनगंटीवार

मुंबई |   काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्थिर नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी एबीपी माझाशी बोलताना ठाकरे सरकारला मिश्किल टोला लगवाल आहे.

सध्या तरी ठाकरे सरकार स्थिर आहे परंतू सरकारमधील नेत्यांची मने अस्थिर आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच महाराष्ट्रातलं राष्ट्रपती राजवट लागू करणं हे भाजपचं मत नसल्याचं सांगत ते वैयक्तिक नारायण राणेंचं मत आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.

कोरोनामुळे शेतकरी, शेतमजूर, तरूण आज प्रचंड अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याच्यावर आज मोठं आर्थिक संकट आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारला एक विशेष पॅकेज जाहीर करायला काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी विचारला.

दुसरीकडे बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी टोला हाणला. संजय निरूपम यांचं काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं हे जर मत वैयक्तिक असेल तर मग राहुल गांधी यांचं महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त अधिकार नाहीयेत हे मत देखील वैयक्तिक आहे का?, असं मुनगंटीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-सरकार पाडण्यात आम्हाला काहीही रस नाही- देवेंद्र फडणवीस

-केंद्राने ठाकरे सरकारला आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोटींची मदत केली- देवेंद्र फडणवीस

-…म्हणून काॅंग्रेसनं सत्तेतून बाहेर पडावं; ज्येष्ठ काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

-भाजपमध्ये वरिष्ठ नेते असतील, पण मी… नारायण राणेंनी भाजप नेत्यांना सुनावलं

-राज ठाकरेंचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र; केली ‘ही’ मागणी