मुंबई | राज्य विधीमंडळाचं अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
महिला सुरक्षा, मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी, पदभरती घोटाळा, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद चालू झाला आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही मुनगंटीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेचा मराठवाड्यावर राग आहे. कारण मराठवाड्यातील जनता नेहमी भाजप आणि काॅग्रेसला मतदान करते, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.
सरकार गेल्या दोन वर्षात काहीच कामं करू शकलं नाही. सरकारनं सर्व क्षेत्रात महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणजे विनाचालक गाडी सरकार आहे. याचा कधीही अपघात होवू शकतो,अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
ठाकरे सरकार हे प्रत्येक बाबतीत उदासीन आहे. कृतीशुन्य सरकार असल्यानं या सरकारला काहीच काम जमली नाहीत, अशी टीका सरकारवर भाजपकडून करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकार सहाच काय बाराही महिने झोपेत असते. कुंभकर्णसुद्धा यांना बघून म्हणले की, “रिश्ते मे ये हमारा बाप लगते है”, अशी जहरी टीका माजी मंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सरकारनं आमच्याशी कसलीही चर्चा केली नाही. सरकारनं आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. पण हे सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम करत आहे.
गेल्या अधिवेशनापासून आमच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. आमच्या आमदारांचं निलंबन रद्द झाल्याशिवाय आम्ही विधानसभा अध्यशांची निवडणूक होऊ देणार नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला या अधिवेशनात धारेवर धरणाऱ्या नेत्यांमध्ये मुनगंटीवार आघाडीवर आहेत. मुनगंटीवार सरकारला घेरण्याची एकही संधी सध्या सोडत नाहीत.
महत्वाच्या बातम्या
रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा
“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”
‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल