नाशिक : विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून भाजप-शिवसेना यांच्यात मतभेद असताना महायुती होईलचं असा विश्वास भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच प्रेम, युद्ध आणि महायुतीत सगळं काही माफ आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा आज समारोप होत असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थितीत राहणार आहेत.
सभेसाठी राज्यातील भाजपचे नेते नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी शासकिय विश्रामगृहा येथे माध्यमांशी संवाद साधला. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपमधील मेगाभरती आणि महायुतीबाबत भाष्य केलं.
भाजपमध्ये मेगाभरती होत असली तरी जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं जाणार नाही. याची निश्चित काळजी घेतली जाईल. जुन्या कार्यकर्त्यांना डावललं तर पक्षाचं नुकसान होईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शिवसेना, भाजप आणि रिपाइं यांची महायुती होईल. त्यावर मित्रपक्ष एकत्र बसून चर्चा होऊ शकेल, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“माझी राष्ट्रवादीला भिती वाटते… म्हणूनच पवारांनी बीडला येऊन उमेदवार जाहीर केले” https://t.co/Dbm91jZd9g @Pankajamunde @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
“या भितीमुळेच शरद पवारांनी उमेदवारांची घोषणा केली”- https://t.co/85j4SLEifp @Pankajamunde @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादी तर आमच्या खिजगणतीतही नाही- प्रकाश आंबेडकर – https://t.co/B59mgbvaNm @Prksh_Ambedkar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 19, 2019