मुंबई | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly winter session) सुरू आहे. विधिमंडळ अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला आहे. पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही काहीसा असाच प्रकार पहायला मिळाला.
सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mumgantiwar) यांनी पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा उपस्थित करत नवाब मलिकांवर(Nawab Malik) निशाणा साधला आहे. याचबरोबर अजित पवारांना देखील टोला लगावला आहे.
अबू आझमी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सभागृहात काही मुद्दे उपस्थित केले आहेत. हे सभागृह चर्चा आणि संवादासाठी आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे नवाब मलिकांकडे विधी व न्याय खातं नाही. पण त्यांनी यावर कायदेशीर मार्गदर्शन व्यक्तिगत आधारे केलं की सरकारचं मत व्यक्त केलं?, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
अल्पसंख्यांक मंत्री आरक्षण देत नाहीत. नाहीतर यांनी रात्रीच्या रात्री फाईल काढली असती, असं मुनगंटीवार म्हणाले. यानंतर सत्ताधारी पक्षातून गोंधळ घालत मग तुम्ही कशाला रात्रीचे उद्योग करता अशी विचारणा केली. यानंतर मुनगंटीवारांनी या मुद्यावरुन अजित पवारांवरच निशाणा साधला.
तुम्ही अजित पवारांचे विरोधक आहात का? मग कशाला रात्रीचे उद्योग तुम्ही करता असं म्हणता. अजित पवारांच्या हातून एकदा चूक झाली असेल म्हणून तुम्ही वारंवार त्यांच्यासंदर्भात असं बोलणार का? हे बरोबर नाही, ते आमचे जवळचे मित्र आहेत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याचे पडसाद आज विधानसभेत उमटल्याचं पाहायला मिळालं. तसेच या प्रकरणी मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांन भेटून चर्चा करेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
मंत्र्यांना कोणी धमकी देत असेल तर त्याला ठेचलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच आदित्य ठाकरेंना धमकी आली त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असं फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ
शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता; ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?
‘आपला बाप आजारी असताना…’; उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हाडांनी झाप झाप झापलं
Corona लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज; ‘ही’ दिलासादायक बातमी आली समोर
“अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर ते 4 दिवसांत राज्य विकून मोकळे होतील”