मुंबई | हिवाळी अधिवेशनात पेंग्विन आणि त्यांच्यावर होणारा खर्च, त्यांची आवश्यकता, त्यांच्यासाठीचा हट्ट अशा बऱ्याच मुद्द्यांवरून राजकीय टोलेबाजी, आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले आहेत. पण पेंग्विनचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यंदा राजकीय आरोपांमुळे नसून थेट राज्याच्या विधानसभेत याचा संदर्भ आला आहे.
पेंग्विनच्या मुद्द्यांवरून सरकारवर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी टीका करताना थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरच खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. परिणामी सध्या मुनगंटीवारांच्या या वक्तव्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
मला एक गरीब विद्यार्थी भेटला आणि म्हणाला मला नोकरीच मिळत नाही. मी आता 100 रूपये रोजदांरीवर काम करतो. मी म्हणाले चांगले दिवस येतील थोेडा धिर धर. त्यानंतर त्यार्थ्या विद्यानं मला जे बोलला ते महत्त्वाचं आहे, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
साहेब मला तर वाटतं की मरावं आणि राणी बागेतल्या पेंग्विनच्या रूपात जन्माला यावं. मी त्याला म्हणालो असं का वाटत तुला तेव्हा त्यानं राणी बागेतल्या पेंग्विनवर केला जाणारा खर्च मला सांगितला, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
त्या पेंग्विनवर दर दिवसाला 20 हजार रुपये खर्च होतात. म्हणजेच तासाला 833 रूपये खर्च करण्यात येतो. हा खर्च महिन्याला तब्बल 6 लाख रूपये इतका आहे. वळसे साहेब इतका पगार तर तुम्हाला देखील नाही की, असा टोला मुनगंटीवार यांनी गृहमंत्र्यांना लगावला आहे.
राणीबागेतल्या पेंग्विनचा पगार हा खूप वरच्या श्रेणीत येतो कारण मंत्र्यांना देखील 2 लाख 52 किंवा 53 हजार पगार मिळतो. मात्र पेंग्विनवर खर्च हा याच्या तीप्पट होतो. सध्या मुनगंटीवार यांचा विधानसभेतील पेंग्विनवर बोलतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
मंत्र्यांपेक्षा हा पेंग्विन भारी आहे. मरावे परी न पेंग्विन व्हावे, असा टोला मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला आहे. मुनगंटीवार यांच्या या भाषणानं पुन्हा राणीच्या बागेतील पेंग्विनचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांच्या या टीकेनंतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेंग्विनचा मुद्दा उपस्थित शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती!
“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका”
‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर
अत्तरवाल्याकडे सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले, मागवावा लागला कंटेनर
भारतातील Omicron बाधितांचा धक्कादायक रिपोर्ट समोर, ‘कोरोना लस घेतलेल्यांनाच…’