मनोरंजन

‘सुई-धागा’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित; खालील लिंकवर क्लिक करुन पाहा

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अभिनेता वरुण धवन यांच्या सुई-धागा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यूट्यूबवर हा ट्रेलर पाहण्यासाठी वाचकांच्या चांगल्याच उड्या पडत आहेत. 

मौजी आणि ममता या जोडप्याची ही कथा आहे. भारतातील हँडल्यूम उद्योगाला कराव्या लागणाऱ्या संघर्षाची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेड इन इंडिया’ मोहिमेला धरुन हा चित्रपट आहे. 

‘सुई-धागा’च्या रुपाने अनुष्का शर्मा आणि वरुण धवन पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांचा खेडवळ अंदाज लोकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. 

सुई-धागा चित्रपटाचं बहुतांश चित्रीकरण भोपाळमध्ये झालंय. तर काही चित्रीकरण मुंबई आणि दिल्लीमध्ये झालंय. 28 सप्टेंबर 2018 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

पाहा ट्रेलर-

IMPIMP