पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणाच उतरणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र स्वत: सुजात आंबेडकरांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
वयोमर्यादेच्या अटीमुळे मी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सुजात आंबेडकरांनी सांगितलं आहे. या विधानसभा निवडणुकीत मी कोठूनही उभं राहणार नाही, असं सुजात आंबेडकरांनी म्हटलं आहे.
निवडणुक आयोगाच्या नियमानुसार निवडणुक लढवण्यासाठी 25 वर्षे पूर्ण असावी लागतात माझं वय त्यात बसत नाही आणि मोदी, स्मृती इराणींसारखं खोटं प्रमाणपत्र देण्याची आमची संस्कृती नाही, असा टोला सुजात आंबेडकरांनी लगावला आहे.
आम्ही शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न, जमिनीचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न घेऊन निवडणूक लढवणार आहोत. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. एकीकडे पूर परिस्थिती तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. बेरोजगारी शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडू, असंही सुजात आंबेडकरांनी सांगितलं.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी राज्यातील तरूणासाठी एक मंच आहे. यापूर्वी तरूणांचा फक्त स्वत:च्या राजकारणासाठी वापर झाला. मात्र आम्ही युवकांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देणार आहोत, असं सुजात आंबेडकरांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
भाजप अध्यक्षांच्या पहिल्याच बैठकीला उदयनराजे भोसलेंची दांडी! – https://t.co/LArZoaYUfo @BJP4Maharashtra @Chh_Udayanraje
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
पुण्यातील ‘या’ जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अजूनही रस्सीखेच – https://t.co/NBKSE1W1gP @NCPspeaks @INCMaharashtra @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019
मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्यासाठी सर्व नेत्यांना एकत्र यावं लागेल- नितीन राऊत – https://t.co/JhWvXto2g5 @NitinRaut_INC @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 23, 2019