अहमदनगर | जिथे न्याय मिळेल तिथे आम्ही आहोत. आमच्यावर अन्याय करा. आम्ही एक मिनिटात पलटी मारू असं वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. ते नगरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
माणूस एका कुटुंबाविरोधात, एका वैचारिकते विरोधात आजीवन लढला म्हणून त्याच्यावर अन्याय व्हावा, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी (farmer) लढला म्हणून अन्याय व्हावा, हा अन्याय आम्हाला मान्य नाही, असंही ते म्हणाले.
आमचा गट जिवंत ठेवतो. आमचे कार्यकर्ते जिवंत ठेवतो. ज्या दिवशी विखेंचे कार्यकर्ते संपतील त्या दिवशी शेतकऱ्यांना कोणीही वाली राहणार नाही, असंही सुजय विखे म्हणालेत.
पक्षासाठी मोदींच्या विरोधात पाथर्डीत रॅली काढली, तो पक्ष आम्हाला न्याय देऊ शकला का? नाही देऊ शकला. म्हणून आम्ही पलटी मारली, असं खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईवरून भाजपवर दोन दिवसांपूर्वीच निशाणा साधला आहे. तर केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेचा समाचार रोहित पवार यांनी घेतलाय.
वकील सतीश उके हे सातत्यानं भाजपच्या विरोधात बोलतात. तर त्यांच्याकडे बीजेपी विरोधात पुष्कळ माहिती आहे. ती घेण्यासाठी कारवाई केली असावी, असं मत पवारांनी व्यक्त केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, अत्यंत धक्कादायक बातमी समोर
“कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू”
सर्वात मोठी बातमी! HDFC ने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा
जिओचा धमाका प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फ्री कॉलिंग आणि बरंच काही…
“गोपीनाथ मुंडेंच्या वारसदारांना संधी मिळाली होती पण…”