अहमदनगर : अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना आव्हान ठरू पाहणारे कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांचं मन वळवण्यात खासदार सुजय विखे यांना यश आलं आहे. सुजय विखेंनी यांनी मध्यस्थी केल्याने राऊत आता भाजपमध्येच राहणार असल्याचं कळतंय.
नामदेव राऊत आता भाजपमध्येच राहणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत राम शिंदेना मदत करणार असल्याचं समजतंय. कर्जतमध्ये पत्रकार परिषदेत नामदेव राऊत यांनी आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
सुजय विखेंनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राऊत याचं कौतुक केलं. राऊत यांची ताकद मोठी असल्याने त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करून त्यांना थांंबवण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली, असं सुजय विखेंनी सांगितलं आहे.
मी पक्षाकडे माझा विचार करण्याचा आग्रह धरला होता. विखे पाटलांनी मध्यस्थी केली नसती तर माझ्यासाठी सर्व पर्याय खुले होते, असं नामदेव राऊत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कर्जत-जामखेडचे प्रतिनिधीत्व स्थानिक भूमिपुत्रानेच करावं ही भूमिका कायम असून भविष्यातही तोच विचार राहिल. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करू, असं राऊत यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या-
…तर राजकारणातून संन्यास घेईन; देवेंद्र फडणवीसांच विरोधकांना खुलं आव्हान- https://t.co/OrwAEGvBf2 @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
चंद्रकांत पाटलांच्या एक पाऊल पुढे रामदास आठवले; म्हणतात एवढ्या जागा ‘फिक्स’ मिळणार! https://t.co/59gHlQfH3o @RamdasAthawale @ChDadaPatil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019
…अन् आचारसंहिता लागताच शरद पवारांनी तात्काळ विश्रामगृह सोडलं!- https://t.co/XLTgjSkmkE @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 21, 2019