साकळाईसाठी खा. सुजय विखेंनी घेतली जयंत पाटलांची भेट

मुंबई |  अहमदनगर आणि श्रीगोंद्यासाठी वरदान ठरणाऱ्या साकळआई पाणी योजनेसाठी नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. पाटील यांची भेट घेऊन त्यांनी साकळाई योजना लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती केली.

साकळाई पाणी योजना जर मार्गी लागली तर नगर आणि श्रीगोंद्याला त्याचा मोठा फायदा होणार आहे. 25 वर्षांपासून रखडलेला पाणी प्रश्न या योजनेमुळे मार्गी लागणार आहे. याचा फायदा 35 गावांना होणार आहे, ही सगळी माहिती खासदार विखे यांनी मंत्री पाटील यांच्या लक्षात आणून दिली.

साकळाई उपसा जलसिंचन ही योजना गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही योजना व्हावी म्हणून गेली अनेक वर्ष आंदोलन आंदोलनं करत आहेत. लोकसभेवेळी अभिनेत्री दिपाली सय्यद हिने या योजनेसाठी मोठं आंदोलन छेडलं होतं.

दरम्यान, विखे यांनी या योजनेचं महत्त्व आणि  या योजनेमुळे नागरिकांचं होणारं समाधान लक्षात आणून दिल्यावर मी  याप्रश्नावर लक्ष देईन आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर त्यांच्याशी चर्चा करतो, असं आश्वासन पाटील यांनी विखे यांना दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकारच्या शपथविधीवर नेमका किती कोटींचा खर्च??; अधिकारी माहिती लपवतायेत?

-डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्यावर मनसेचा आक्षेप

-मोदी सरकारचा दिल्लीकरांना दणका; निकालानंतर गॅस 144 रूपयांनी वाढला!

-दिल्लीत शिवसेनेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त!

-“अरे कशाला करताय बंगल्यांची दुरूस्ती… डागडुजी होण्याअगोदरच तुमचं सरकार पडणार”