अहमदनगर : राज्यातील एक पीढी उद्ध्वस्त करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पापाचा घडा भरला आहे. ईडी आणि सीबीआय दबाव आणून आमदारांना पक्ष सोडायला भाग पाडत असल्याचा कांगावा राष्ट्रवादीेने सुरू केला आहे, असं म्हणत भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
नगर लोकसभा मतदारसंघात विजयी झाल्याबद्दल सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील साडे आठ कोटींच्या विकासकामांचे भूमिपुजन आणि उद्घाटन सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत विखे कुटुंबीयांना संपविण्याचं विरोधकांचं षडयंत्र होतं, असा आरोप सुजय विखेंनी केली आहे. यावेळी बोलताना सुजय विखेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं
काँग्रेस-राष्ट्रवादीवर आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्याची वेळ आली, असा टोला देखील सुजय विखेंनी विरोधकांना लगावला आहे.
दरम्यान, निवडणुकीला उभारण्यासाठी विरोधकांचे उमेदवार घाबरत असून पक्षातील प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवत आहे, असंही सुजय विखेंनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
…अशी मागणी जगात कोणीही केली नसेल- पंकजा मुंडे- https://t.co/2SY3yK31pW #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
ओला उबेरमुळे वाहन क्षेत्रावर मंदी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचं तर्कट https://t.co/uCko3YnyCh @nsitharaman
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019
पंखांना बळ देण्याऐवजी ते छाटणारं हे सरकार आहे- अजित पवार https://t.co/TDJ9IC2IVl @AjitPawarSpeaks @ChDadaPatil @Dev_Fadnavis
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019