अहमदनगर | मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांची नावं मी लिहून ठेवली आहेत. वेळ येईल तसं त्यांना उत्तर देईल, असा सूचक इशारा अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी दिला आहे. ते साम टीव्हीशी बोलत होते.
अहमदनगर जिल्ह्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी मी हद्दपार करण्याचं ठरवलंय. आगामी विधानसभेला जिल्ह्यात 12-0 अशी काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था करण्याचा मानस आहे, असं सुजय विखे म्हणाले.
मुख्यमंत्री सांगतील त्या पद्धतीने जिल्ह्यात म्हटलं तर जिल्ह्यात आणि राज्यात म्हटलं तर राज्यात प्रचार करायला सज्ज असल्याचं, सुजय यांनी यावेळी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीने मला मोठा अनुभव दिलाय. त्याच अनुभवाच्या जोरावर मी आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजप शिवसेनेची युती होणार आणि पुन्हा एकदा युती आघाडीचा धुव्वा उडवून सत्तेत येणार, असं भाकितही त्यांनी यावेळी केलं.
महत्वाच्या बातम्या-
आईनस्टाईने गुरूत्वाकर्षण शोधण्यासाठी गणित वापरले नाही- पियुष गोयल https://t.co/3uB8nYLcW2 @PiyushGoyal
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
इस्रोच्या मदतीला नासा धावली; ‘विक्रम लँडर’शी संपर्क साधण्यासाठी मदतीचा हातhttps://t.co/pfnQeQLI0Y @isro @NASA
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019
काँग्रेस मुख्यालयात आता राहुल गांधींसाठी स्वतंत्र कक्षही नाही!https://t.co/WWmYOWiqUy @RahulGandhi @INCIndia
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 12, 2019