शिर्डीचं साई मंदिर खुलं करा अन्यथा…; सुजय विखेंचा राज्य सरकारला इशारा

अहमदनगर | लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या राज्यातील मंदिर उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ठाकरे सरकारमधील नेत्यांनीही मंदिर उघडण्याची मागणी केली आहे. अशातच भाजप खासदार सुजय विखे पाटील शिर्डीच्या मंदिरावरून आक्रमक भूमिका घेणार असल्याचं दिसत आहे.

राज्य‌ सरकारने मॉल चालू केले, व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली, त्यामुळे मंदिरे बंद ठेवणं योग्य नाही. शिर्डीचं साई मंदिर लवकरात लवकर खुलं करण्यात यावं अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा देत विखेंनी मंदिर खुलं करण्याचा मागणी राज्य सरकारला केली आहे.

आवश्यक उपाययोजना‌‌ करणाऱ्या सर्वच मंदिरांना आता खुले करा. त्यामुळे परिसरातील रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. प्रवरा कारखान्यावर सपत्निक श्री गणेशाची विधीवत स्थापना विखे पिता-पुत्रांनी केली. यावेळी विखेंनी साई मंदिर खुल करण्याची मागणी केली.

दरम्यान, केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील तिरुपती, वैष्णोदेवी मंदिर सुरु झालं. शिर्डी संस्थान आर्थिकदृष्या सक्षम असल्याने ऑनलाईन दर्शन सुविधा असल्याने मंदिर सुरु करणे सोयिस्कर असून, गर्दी न होता ठराविक संख्येने भाविकांना दर्शन देणं शक्य आहे. यासंदर्भात ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार असून सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न नाही झाली तर आम्ही न्यायालयात जाणार असल्याचं सुजय विखे पाटलांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रामाणिक व्हावं, ते खोटं बोलत नाही असा एकही दिवस नाही”

गणपतीच्या पाटाखाली भारताचे संविधान ठेवल्यामुळे ट्रोल झालेल्या तरडेंनी मागितली जाहीर माफी; म्हणाले…

आर्थिक क्षेत्रात भारताचा चीनला आणखी एक झटका; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

सुशांतच्या संपत्तीचा वारस कोण? सुशांतच्या वडिलांचा मोठा निर्णय

शिवसेना 2014-19 दरम्यान भाजपसोबत नसती तर…; फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा