मुंबई | महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावर अभिनेता सुमित राघवनने प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयावर सुमित राघवन याने प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने ट्विट करत काही सवाल उपस्थित केले आहेत.
सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. सरकारचा हा निर्णय बॉम्बेचं मुंबई करण्यासारखा आहे, कृपा करून मोठा विचार करा. दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?, असं त्याने म्हटलंय.
याने खरंच काही मदत होणार आहे का? तर नाही. मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा, मराठी पालकांना आपल्या मुलाला मराठी शाळेत दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करा, असं सुमित राघव म्हणालाय.
दुकानांची नावं मराठीत लिहिणं हे सगळं वरवरचं झालं. जो “मराठी” आहे त्याला किंमत आहे का भाषेची? मग अमराठी व्यापाऱ्यांच्या माथी का मारा? ही बळजबरी झाली नाही का? अवस्था बघा मराठी शाळांची?, असं म्हणत सुमित राघवनने ठाकरे सरकारला सुनावलं आहे.
मोलकरीण आणि ड्रायव्हरच्या मुलांबरोबर शिकतील का आमची मुलं? असं काही पालक म्हणताना ऐकलंय आम्ही. लै प्रेम आपल्याला इंग्लिशचं. चांगलं आहे, असावं. पण एवढं लक्षात घ्या बोर्ड, फलक मराठीत लिहून मराठी अस्मिता जपली जात नाही. आतून बदल घडला पाहिजे. जे दुरापास्त वाटतंय, असंही सुमित राघवनने म्हटलंय.
यापूर्वी सुमतची पत्नी चिन्मयीने देखील फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता.
हे रील पाहून तुम्हाला कदाचित ,कदाचित कशाला हमखास हसू येणार आहे…पण हळू हळू असंच होणार आहे. मराठी आकडे, मराठी स्वर, व्यंजनं, मुळाक्षरं सारीच विस्मरणात जाणार आहेत, असं चिन्मयीने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
पेट्रोल-डिझेलसाठी आता मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत, वाचा आजचे ताजे दर
राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख
5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग