आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ ट्विटला सुमीत राघवनचं उत्तर!

मुंबई : शिवसेनेच्या विरोधामुळं गाजत असलेल्या मुंबईतील मेट्रो-3 प्रकल्पाला पाठिंबा दिल्यानंतर अभिनेता सुमीत राघवन यानं आता पुढचं पाऊल टाकलं आहे. सुमीतनं ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून सुनावलं आहे. सुमीतच्या या ट्विटची राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

निवडणूक आयोगानं आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. निवडणुकीची घोषणा होताच आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट केलं.

निवडणुकीची घोषणा झालीय. लोकशाहीचा उत्सव सुरू झालाय. तुमचं सरकार, तुमचं भवितव्य घडवण्याचा अधिकार बजावण्याची वेळ आलीय. हीच ती नवा महाराष्ट्र घडवण्याची वेळ आहे, असं आदित्य ठाकरेंनीनी ट्टिवमध्ये म्हटलंय.

आदित्य यांच्या या नव्या महाराष्ट्रच्या ट्विटवर सुमीतनं प्रतिक्रिया दिलीय. आदित्या ठाकरेंच्या ट्विटला उत्तर देत सुमीत राघवनने आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल, असं त्यानं म्हटलंय. सोबत #येरेमाझ्यामागल्या असा हॅशटॅगही दिलाय. सुमीतच्या या टीकेला शिवसेना कसं प्रत्युत्तर देते, हे आता पाहावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-