देशात कोरोनाचा कहर सुरूच… पाहा कालच्या दिवसांतली धक्कादायक आकडेवारी

नवी दिल्ली | देशात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नांची शिकस्त करत आहे. मात्र अनलॉकिंग केल्यापासून कोरोनाचे नवे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. गेल्या 24 तासांत 11, 504 नव्या कोरोना बाधित केस समोर आल्या आहेत.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून परवा दिवशी म्हणजेच शनिवारी आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ कोरोनाग्रस्तांमध्ये झाली होती. काल हा आकडा थोडासा कमी झाला आहे. रविवारी 11, 504 नव्या कोरोना बाधित केस समोर आल्याने देशातली एकूण रूग्णसंख्या आता 3 लाख 32 हजार 424 वर जाऊन पोहचली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे आपातपर्यंत 9520 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

देशात सध्या 1 लाख 53 हजार 106 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 69 हजार 798 रूग्णांन डिस्चार्ज दिला गेला आहे. म्हणजेच एकूण अ‌ॅक्टीव्ह केसेसपैकी डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

दुसरीकडे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. दररोज तीन ते साडे तीन हजार रूग्णांच्या जवळपास नव्या कोरोनाबाधितांची वाढ होतो आहे.महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-सुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असतील किंवा फॉरवर्ड कराल तर… ; पोलिसांचा कडक इशारा

-मुंबई लोकल आजपासून पुन्हा सुरू… फक्त ‘यांनाच’ मिळणार प्रवेश

-धक्कादायक, सुशांतच्या गळफासाला 8 तास होत नाही तोपर्यंतच मुंबईत दुसरी आत्महत्या…!

-आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, अमित शहा आम्ही तुम्हाला विनंती करतो की…- सुशांतचे नातेवाईक

-सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलंय माहितीये…. पाहा-