सुनिल गावसकर यांचं महेंद्रसिंग धोनीबाबत खळबळजनक वक्तव्य!

मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी महेंद्रसिंग धोनीबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचा काळ संपला आहे. संघाने आता त्यांना विश्वचषक जिंकवून देणाऱ्या माजी कर्णधाराचा विचार सोडून पुढचा विचार करायला हवा. आता टीम मॅनेजमेंटला धोनीच्या नंतरचा विचार करायला हवा, असा सल्ला गावसकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवड समितीला दिला आहे.

आपल्याला आता पुढील विचार करायला हवा. धोनी आता संघात बसत नाही. माझ्या संघात तरी तो बसत नाही, असं सुनिल गावसकर यांनी म्हटलं आहे. 

जर तुम्ही टी-20 विश्वचषकाबाबत बोलत आहात, तर मी रिषभ पंतचा विचार करेन. मी संजू सॅमसनबाबत विचार करेन, असं गावसकर यांनी म्हटलं आहे.

मी तरुण खेळाडुंबाबत विचार करेन. कारण आता आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. धोनीबाबत माझ्या मनात आदर आहेच आणि मला वाटतं की त्याला संघातून बाहेर करण्याआधी चांगल्यापद्धतीने निरोप दिला जावा, असं सुनिल गावसकर म्हणाले.

दरम्यान, सुनील गावसकर यांनी थेट धोनीच्या निवृत्तीविषयी भाष्य केल्याने पुन्हा एकदा धोनीच्या विवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-