“चंद्रकांत पाटील, अजून निवडणुकांमधली अंगावरची हळद उतरली नाही?”

रत्नागिरी | आता आम्ही मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागलो आहोत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

अजून निवडणुकांमधली अंगावरची हळद उतरली नाही?. त्या भाजपच्या आमदारांना पुन्हा निवडणुकीत काही स्वारस्य असेल असं वाटत नाही, असा टोला सुनील तटकरे यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते.

सत्तेपासून बाजूला गेल्याने माशाची जशी पाण्यासाठी तडफड होते, तशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका सुनील तटकरे यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपच्या 100 आमदारांना मध्यावधी निवडणुका हव्यात, असं वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष कार्यरत रहाणार आहे, असंही सुनील तटकरे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

-सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांना मोठा पाठिंबा!

-नाशिक जिल्ह्याच्या शाळांमध्ये वीजेची तक्रार; शिक्षणमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश

-…म्हणून आता इंदुरीकर महाराज ‘बाऊन्सर’ घेवून फिरणार!

-“गद्दारांना माझ्या पक्षात जागा नाही, दोन दिवसात गद्दारांची हाकालपट्टी होईल”

-राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… महापोर्टलद्वारे नाही तर ऑफलाईन होणार!