सुनिल तटकरे गेले चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर अन् नव्या राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : सध्या भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे वारे वाहत आहेत. विरोधी पक्षाला चांगलीच गळती लागली आहे. आता अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचं मंत्रालयासमोरचं निवासस्थान हे राजकीय घडामोडींचे केंद्र बनलं आहे.

बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे काही खासगी कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर गेले होते. मात्र त्यावेळी नुकतेच राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेशाची वाट पाहत असलेले वैभव पिचड, चित्रा वाघ आणि आमदार संदीप नाईक यांची बैठक सुरु होती, अशी माहिती मिळत आहे.

सुनिल तटकरेंच्या तिथे जाण्याने काही क्षणांसाठी सर्वजण आवाक झाले. पक्षांतराच्या वाऱ्यात आपल्या नावाची चर्चा नको म्हणून तटकरेंनी क्षणाचाही विलंब न करता बंगल्यातून तात्काळ निघून गेले.

उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे फोटोस काढले. तसेच राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षांना चंद्रकात पाटलांच्या बंगल्यात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या चित्रा वाघ, आमदार संदीप नाईक, आमदार शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवार शेजारी बसलेले… अन् मुख्यमंत्री फोडाफोडीच्या राजकारणावर म्हणतात…

-पवार साहेब… ‘या’ नेत्याने पद्धतशीरपणे राष्ट्रवादीचं वाटोळं केलंय- जितेंद्र आव्हाड

-शोलेचा डायलॉग बदलून आता म्हणावं लागतंय ‘जो डर गया वो भाजप में गया’!

-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साताऱ्याच्या गडानंतर सोलापूरचा बुरूज ढासळणार??

-अन् मुस्लिम महिलांना न्याय देणारं ‘तीन तलाक’ विधेयक राज्यसभेत मंजूर!