सुनील तटकरेंना मोठा धक्का; ‘या’ कट्टर समर्थकानं केला शिवसेनेत प्रवेश

रायगड:  राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक रघुवीर देशमुख यांनी आपल्या परिवारासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. कट्टर समर्थकाने शिवसेनेत प्रवेश केल्याने सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्या खास निकटवर्तीयांपैकी असलेल्या रघुवीर देशमुख यांनीच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भरतशेठ गोगावले यांचं पारडं जड होणार असंल्याचं बोललं जात आहे. 

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या महाड तालुक्यातील ढालकाठी येथील शिवनेरी या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. रघुवीर देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने रायगड विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण तालुक्यात शिवसेनेला त्यांचा अनुभव आणि अभ्यासाचा फायदा होईल, अशी अपेक्षा भरत गोगावले यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना संघटनेत रघुवीर देशमुखांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, असं आमदार गोगावले यांनी सांगितलं. तर रघुवीर देशमुख यांनी आपल्या प्रवेशाप्रसंगी विकासकामांना चालना देण्याकरिता आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केलं. पण त्याचवेळी खासदार सुनील तटकरे यांच्या परिवाराविषयी आपल्याला आदर असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुनिल तटकरे यांच्या विजयात रघुवीर देशमुख यांचा मोलाचा वाटा होता.

देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशाने रायगड शिवसेनेला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि पर्यायाने सुनील तटकरेंसमोर चांगलंच आव्हान निर्माण होणार असल्याचं बोललं जात आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-पूरग्रस्तांना गायी, म्हशी द्या; महेश लांडगेंचं दहिहंडी आणि गणेश मंडळांना आवाहन

-बाळासाहेबांमुळे गिरणी कामगाराचा मुलगा मुख्यमंत्री झाला- नारायण राणे

-बीडचा दुष्काळ हटवण्यासाठी पंकजा मुंडेंची योजना; मुख्यमंत्र्यांकडे सादर

-वडिल 9 वेळा काँग्रेसचे खासदार, ‘या’ नेत्याची आमदार मुलगी करणार शिवसेनेत प्रवेश???

-देशहिताच्या आड धर्म येता कामा नये!;’एक देश, एक संविधान’ भूमिकेचं ठाकरेंनी केलं स्वागत