सनी लिओनीच्या पाठीला गंभीर दुखापत?; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मुंबई| आपल्या हॉट अंदाजामुळे अभिनेत्री सनी लिओनी कायमच चर्चेत असते. त्यामुळेच तिच्याविषयीची कोणतीही चर्चा चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरते. यामध्येच सध्या सोशल मीडियावर तिच्या पाठीला झालेल्या गंभीर दुखापतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये सनीची पाठ रक्ताळलेली दिसत आहे. त्यामुळे सनीला नेमकी कसली दुखापत झाली आहे हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. नेहमीच काही ना काही काही कारणांमूळे सनी लिओनी चर्चेत असते.

सनीच्या पाठीला खरोखरची दुखापत झाली नसून एका फोटोशूटमधील हा व्हिडीओ आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मेकअप आर्टिस्ट सनीच्या पाठीवर मेकअप करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा मेकअप अत्यंत सुंदररित्या करण्यात आला असून खरोखरचं सनीला दुखापत झाल्याचा भास होत आहे. या व्हिडिओमध्ये मेकअप आर्टिस्टने सनीच्या पाठीवर आर्टिफिशियल स्किन लावली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सनीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने जनावरांना त्रास न देण्याचा संदेश दिला आहे. पॉर्नस्टार ते बॉलिवूड स्टार असा प्रवास करणारी सनी आज लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक चर्चा वेगाने पसरत असते.

 

महत्वाच्या बातम्या- 

-महाविकास आघाडीचा सरकारचा मोठा निर्णय राज्यातील 305 शाळा होणार बंद

-शिवस्मारकाच्या कामात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही- अशोक चव्हाण

-नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात…

-मराठा आंदोलकांना न्याय मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आक्रमक

-हे तीन पक्षाचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालण्याच्या नादातच पडेल- रावसाहेब दानवे