बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी गेल्या काही दिवसांपासून लाईमलाईटपासून दूर आहे. सोशल मीडियावर तशी सनी खूप एक्टीव असते, मात्र गेल्या काही दिवसांपासून ती या सर्व गोष्टींपासून दूर होती. जुन्या अवतारात तिच्या चाहत्यांना ती अलिकडच्या काळात कधीच दिसली नव्हती. मात्र खूप दिवसांपासून सुरु असलेल्या तिच्या चाहत्यांची उत्कंठा सनीने संपवली आहे. तिने तिच्या प्रोफाईल तिचे अत्यंत हॉट फोटो टाकले आहेत. तिने हॉट फोटो स्वतःच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करताच चाहत्यांच्या एकच उड्या पडल्या आहेत. कमेंट आणि लाईक्सचा नुसता पाऊस पडला आहे.
सनी सध्या आपल्या नवऱ्यासह सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सनीने आपल्या बिकीनीवाल्या फोटोवर तिचं लोकेशन सुद्धा सांगितलं आहे. ती सध्या मेक्सिकेमध्ये असून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पांढऱ्या रंगाच्या बिकीनीमध्ये सनी चांगलीच सेक्सी दिसत आहे. चाहत्यांना तीचा हा लूक चांगलाच भावला आहे.
नवरा डॅनियल सनीच्या सोबत आहे. तसा तो सावलीसारखा तिच्या सोबत असतो. मेक्सिकोमध्ये तो सुद्धा तिच्या सोबत पोहोचला आहे. समुद्रामध्ये पोहोण्याचा आनंद दोघं लुटत आहेत. सनीने दोघांचा एक सेल्फीसुद्धा पोस्ट केला आहे. या फोटोला सुद्धा कमेंट आणि लाईक्स मिळत आहेत.
View this post on Instagram
सनी फक्त नवऱ्याला नव्हे तिच्या काही मैत्रिणींना देखील सोबत घेऊन गेली आहे. तिच्या मैत्रिणीसुद्धा तिच्यासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. समुद्रात पोहोण्याचा आणि सनबाथ घेण्याचा आनंद काही औरच आहे. अंगाला वाईन लावून हा आनंद लुटण्याचं त्यांचं काम सुरु आहे. सनीने या आपल्या खास मैत्रिणींसोबतचा फोटो देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
सनीने स्वतःचे आणखी काही सेक्सी फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंना सुद्धा चांगलेच लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत.