मुंबई | बॉलिवूडची बेबी डॉल म्हणून प्रसिद्ध असलेली सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. आपल्या नृत्य आणि अदांनी प्रेक्षकांवर भूरळ घालणाऱ्या सनीचे अनेक चाहते आहेत.
सनी लिओनीचा भूतकाळ अनेकांना माहित आहे. सनी याविषयी न बोलणंच पसंत करते. आधीच्या आयुष्यावर तिला प्रश्न विचारल्यावर सनी अस्वस्थ झाल्याचं पहायला मिळतं.
अशातच एका कार्यक्रमात सनीने तिच्यावर होणाऱ्या चर्चांना उत्तर दिलं आहे. काही वर्षांपूर्वी असे लोक माझा तिरस्कार करायचे. जेव्हा मी टीव्ही शोमध्ये दिसले तेव्हा माझ्यावर टीका झाली. पण आता सर्वकाही बदलले आहे, असं सनी म्हणाली.
मला ज्यावेळी माझ्या आयुष्यावर प्रश्न विचारले जातात. त्यावेळी मी अस्वस्थ होते. स्टूडियोमध्ये मला प्रश्न विचारले जातात त्यावेळी कोणीही त्या प्रश्नांवर आक्षेप घेत नाही, असं सनी म्हणाली आहे.
लोकांनी मला स्वीकारले आहे. मी आजही तीच सनी आहे जी मी तेव्हा होते. पण त्यावेळी मला खूप वाईट वाटलं, असं सनी लिओनी म्हणाली आहे.
ज्या लोकांनी माझ्यासाठी आवाज उठवला. ज्यांनी माझ्यासाठी खूप त्रास सहन केला, असं म्हणत सनीने त्यांचे आभार देखील मानले आहेत.
नुकताच सनी लिओनीचा 1960 मधील कोहिनूर चित्रपटातील ‘मधुबन मे राधिका’ गाण्याचा रिमेक प्रसिद्ध झाला आहे.
दरम्यान, सनी लिओनीच्या या म्यूझिक व्हिडीओमुळे हिंदू धर्मियांंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!
कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…
…म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ
अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार
प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली!