‘मुंबई सोडून जायचं नव्हतं पण…’; सनीने सांगितलं अमेरिकेला जाण्यामागचं खरं कारण

मुंबई | ‘मदर्स डे’निमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री सनी लिओनने लॉस एंजिलिसला गेल्याची माहिती दिली. मात्र तिला मुंबई सोडून जायचं नव्हतं, असं सनीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

मला मुंबई सोडायची नव्हती. त्यामुळे मला इथे येण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागला. पण डॅनिअलच्या आईसाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय घ्यावा लागला. अशा कठीण काळात कुटुंबीयांसोबत राहणं जास्त महत्त्वाचं आहे, असं सनीने म्हटलं आहे.

लॉस एंजिलिस येथील बंगल्यात सनी व तिचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचं सनीने सांगितलं. त्याचसोबत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होताच भारतात परतणार असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मला मुंबईची फार आठवण येते. जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होतील, तेव्हा मी परत येईन. डॅनिअल आणि मुलांनाही लवकरात लवकर भारतात परतायचं आहे, असं सनीने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमधील काही निर्बंध केले शिथील तर नव्या उपक्रमांना दिली संमती!

-आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

-वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट; भेटीनंतर परीक्षांबाबत केला मोठा निर्णय जाहीर

-पुण्यात आज 157 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले

-‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार प्रोत्साहनपर रक्कम, मंत्री मुश्रीफांची घोषणा