नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Govt) मोठमोठ्या योजना ग्रामीण भागात तसेच कमी रहिवासी असलेल्या भागात देखील राबवण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली पीएम किसान योजना देखील अनेक भागात राबवण्यात येत आहे.
अशातच आता शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत आहे. येत्या काळात शेतकऱ्यांसाठी सुपर अॅप (Super App For Farmers) चालू करण्याची योजना आणत आहे.
पीक, शेतीतील उत्पन्न, कापणीनंतरचा भावबाजार, हवामानाचा अंदाज आणि बाजार समितीतील भाव यांसारखी माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी सध्या विविध योजनांचे, विविध पद्धतीचे असंख्य स्वतंत्र्य अॅप आहेत. ज्याद्वारे माहिती शेतकऱ्यांना पोहचवली जाते. मात्र, हे सगळे अॅप एकाच फोनमध्ये ठेवणं शक्य नाही. त्यामुळे आता सुपर अॅप आणण्याचा प्रयत्न केला जातोय.
ICAR आणि इतर संस्थेच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे. काही कृषी विज्ञान संस्था देखील यावर काम करत आहेत. त्यामुळे हे अॅप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय नरेंद्र सिंह तोमर यांनी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत त्यांनी या अॅपचा आढावा देखील घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
“हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?”
अनिल देशमुख मंत्रिमंडळात परत येणार?; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं”
“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर”
“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं”