सुपरस्टार महेश बाबूच्या मुलीचं चित्रपटसृष्टीत पदार्पण, पाहा व्हिडीओ

मुंबई | दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असेलला पहायला मिळतो. त्याचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे.

महेश बाबू लवकरच ‘सरकारू वारी पाता’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटानं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

महेश बाबू आणि नम्रता शिरवाडकर यांची लेकही चर्चेत असलेली पहायला मिळतेे. सोशल मीडियावर ती नेहमीच डान्सचे व्हि़डीओ शेअर करताना दिसते.

महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची 10 वर्षांची लेक सितारानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. तिच्या या धडाकेबाज एण्ट्रीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

सिताराने वडील महेश बाबूच्या ‘सरकारू वारी पाता’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटातील पेनी (Penny) या गाण्यात सितारा झळकली आहे.

सिताराच्या पदार्पणामुळे महेश बाबू खूप आनंदी असल्याचं दिसत आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनद व्यक्त केला आहे.

सिताराचा गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. यावर अनेक प्रतिक्रियाही येताना दिसत आहे.

या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्यामुळे सध्या सिताराची जोरदार चर्चा होत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  नारायण राणेंची पुन्हा कोर्टात धाव! BMC ‘अधिश’वर हातोडा चालवणार का?

 “30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण हिजाब घालावा लागेल”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

 Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस

  …म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ

  पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर