‘…तर मी एका मिनिटात राजकारण सोडेल’; राष्ट्रवादी प्रवेशापूर्वीच खडसेंच्या राजकारण सोडण्याच्या वक्तव्यानं समर्थक हैराण!

जळगाव | अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कित्येक दशके भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपचा राजीनामा दिला आहे.

एकनाथ  खडसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

ज्या पक्षाने माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा पक्षात मी जात असल्याची टीका भाजपच्या नेत्यांकडून माझ्यावर करण्यात आली. मात्र, कोणत्याही पक्षाने माझ्यावर टीका केलेली नाही. तसेच माझ्या चौकशीची किंवा राजीनाम्याची मागणी देखील कोणत्याच नेत्यानं केली नाही. तुम्ही माझे आजवरचे सर्व रेकॉर्ड तपासा कोणी असं विधान केलं असेल तर मी एका मिनिटात राजकारण सोडेल, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

तसेच एकनाथ खडसे यांनी यावेळी आपण कोणत्याही केंद्रीय नेत्यावर किंवा पक्षावर टीका केलं नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. आज मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या 40 वर्षांपासून मी भाजप पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आलो. भाजपच्या कोणत्याही नेत्याबद्दल माझ्या मनात रोष नाही. मी भाजपच्या कोणत्याही केंद्रीय नेत्यावर किंवा पक्षावर टीका केली नाही, असं एकनाथ खडसे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

भाजप खेड्यापाड्यात पोहचली नव्हती, भाजप उपेक्षित होती त्यावेळेपासून आजतागायत भाजप पक्षासाठी मी काम केलं आहे. या कालखंडात भाजप पक्षाने देखील मला अनेक महत्वाची राजकीय पदे दिली ते मी नाकारू शकत नाही, असंही एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. खडसे यांच्या पक्षप्रवेशाविषयी पाटील आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ खडसे हे गेल्या कित्येक दशकांपासून भाजपचे नेतृत्व करणारे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबर देखील पक्षाचं काम केलं आहे. त्यांच्यावर पक्षात अन्याय झाला आहे. यामुळे ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. खडसे यांच्या प्रवेशाची बातमी आमच्यासाठी सुखद आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच जयंत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाचा मुहूर्त देखील सांगितला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांच्याबरोबर आणखीही काही नेते राष्ट्रवादीत येण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपचे काही आमदार खडसे यांच्या संपर्कात आहेत. मात्र, कोरोना महामारीमुळे पुन्हा निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे टप्प्या टप्प्याने इतर नेत्यांचा पक्षप्रवेश होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महेंद्रसिंग धोनीनं स्वतःच्याच नकळत आयपीएलमध्ये रचला नवीन विक्रम!

अखेर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं दिली माहिती

भाजपला मोठा धक्का! पक्षांतरापूर्वीच खडसेंनी मोदींविरुध्द टाकलं पहिलं पाऊल

सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता एनसीबी विरोधातच ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल

पंकजा मुंडेंना पाहून का रडत आहेत ‘हे’ आजोबा? वाचा सविस्तर