देश

…तर दुसऱ्या लग्नाला मान्यता; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

घटस्फोटाच्या खटल्यांमध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये खटला मागे घेण्यासंदर्भात तडजोड झाली असेल. घटस्फोटाची याचिका कोर्टात प्रलंबित असली तरी त्यातील एका व्यक्तीला दुसरे लग्न करता येऊ शकते, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना दिला.

घटस्फोटाविरोधात दाखल याचिका फेटाळण्याआधी दुसरे लग्न रोखण्यासंबंधी कायदा लागू होत नाही. हिंदू विवाह कायद्यानूसार घटस्फोटाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचिका प्रलंबित असेल तर दोन्ही पक्षकारांपैकी एकाला दुसरे लग्न करता येत नाही. परंतु जर पक्षकाराने तडजोडीच्या आधारावर खटला कोर्टात पुढे न चालवण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यातील एका व्यक्तीचे दुसरे लग्न मान्य आहे, अशी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 15 मध्ये तरतूद आहे.

सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत पतीने घटस्फोट याचिकेविरोधात खटला मागे घेण्यासाठी अर्ज दाखल केला होता तसेच त्याने त्यादरम्यान दुसरं लग्न सुद्धा केलं होतं. उच्च न्यायालयानं हे लग्न अमान्य केलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयानं पतीची याचिका दाखल करून घेत निर्णय बदलला आणि पतीच्या बाजूने निर्णय दिला.

IMPIMP