देश

मराठा आरक्षणाच्या स्थगितीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्य सरकार आणि मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

अ‌ॅड. गुनरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने राज्य सरकार नोटीस देतानाच दोन आठवड्यांपर्यंत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. 

राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के तर नोकऱ्यांमध्ये 13 आरक्षण नुकतेच आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करुन घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारने पाऊल उचलले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे. आपलं उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. 

दरम्यान, राज्य सरकारने दोन आठवड्यांनंतर आपलं उत्तर दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे. कुणबी आणि इतर मागासवर्गीय संघटनांकडूनही दोन आव्हान याचिका सादर करण्यात आल्या होत्या. 

IMPIMP