उद्याच बहुमत चाचणी व्हावी; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई | महाराष्ट्राचा सत्तापेच सर्वोच्च न्यायालयाच्या दारी गेला होता. या निर्णयाकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं होतं. उद्याच्या उद्या बहुमत चाचणी व्हावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

उद्या 5 वाजेपर्यंत सगळ्या आमदारांची शपथ देण्यात यावी, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. गुप्त मतदान देखील होणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. 27 नोव्हेंबरला उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जावा, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

नव्याने विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याची गरज नाही, असंहा निर्णय न्यायालयाने दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या संध्याकाळी 5 पर्यंतची मुदत असणार आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने स्वागत केलं आहे. भाजपचा खेळ आता संपणार, अशी कमेंट नवाब मलिक यांनी केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-