कोणत्या अधिकारात तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेलात? न्यायालयाने शिंदे यांच्या वकिलाला फटकारले

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) सध्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरु आहे. यात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट वादी आणि प्रतिवादी आहेत.

यावेळी पाच सदस्यीय घटनापिठापुढे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा, खरी शिवसेना कोणाची, 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई आदी मुद्दे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

घटनापिठाने न्यायालयात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबात युक्तीवाद करण्याचे आदेश दिले. यावर शिवसेनेचे वकील कपिल सिब्ब्ल (Kapil Sibal) यांनी आक्षेप घेतला. आणि सर्वप्रथम 20 जूनपासून घडलेल्या घटनांचा आढावा घेण्याची मागणी केली.

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगात याचिका दाखल करण्यापूर्वी महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत. त्यामुळे प्रथम आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिका सिब्बल यांनी घेतली.

यावेळी घटना पिठाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला फटकारले. एकनाथ शिंदे कोणत्या अधिकाराने शिवसेनेचे चिन्ह मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले, असे न्यायालयाने विचारले.

ते शिवसेनेचे सदस्य म्हणून की आमदार म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले, असा प्रश्न खंडपिठाने उपस्थित केला. यावर कपिल सिब्बल म्हणाले, हाच मूळ मद्दा आहे. त्यामुळे यावर प्रथम निकाल झाला पाहिजे, असा पवित्रा त्यांनी घेतला.

एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगात चिन्हासाठी याचिका दाखल केल्यानंतर आताचा पेच निर्माण झाल्याचे घटनापिठाने म्हंटले आहे. यावर सिब्बल यांनी पक्षांतरबंदीचा मुद्दा उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या – 

“…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार” – घटनातज्ज्ञ उल्हास बापट

संजय राऊत यांची आज सुनावणी पार पडली; महत्वाची माहिती समोर

‘राजस्थानातील 90 आमदारांच्या बंडावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मोठा निर्णय’

“… म्हणून त्यांच्यावर पक्षांतरविरोधी कारवाईचा आरोप नक्की करावा”; सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद

“गुजरातचा सिंह महाराष्ट्रात येणार आणि महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार” – सुंधीर मुनगंटीवार