मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

नवी दिल्ली | नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिलाय. 1988 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांच्यात पार्किंगवरून भांडण झालं होतं ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धूने गुरनाम सिंगला गुडघ्यावर पाडलं.

गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली होती.

2002 मध्ये पंजाब सरकारने सिद्धूविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. दरम्यान, सिद्धू यांनी राजकारणात प्रवेश केला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर अमृतसरची जागा लढवली आणि जिंकली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली” 

“पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल”  

“इकडे मशिदी खोदण्यापेक्षा, चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवून दाखवा” 

“कुठेही दगड ठेवा अन् त्याला लाल रंग लावा, लगेच मंदिर तयार होतं” 

“निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् चाकरी दुसऱ्यांची करायची”