मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत राज्यात आघाडीचं सरकार स्थापन केलं. मात्र, या आघाडीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
न्यायालयाने महाविकास आघाडीविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. कुणी कुणाशी युती करावी, हे सांगणं आमचं काम नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्यकर्ते प्रमोद पंडित यांनी ही याचिका केली होती.
राज्यघटनात्मक नैतिकता ही राजकीय नैतिकतेपेक्षा निराळी आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. कुणी कुणाशी युती करायची, याबाबत राजकीय पक्षांना असलेले अधिकार आम्ही कमी करु शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होती. मात्र निकालानंतर शिनसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या भिन्न विचारसरणी असणाऱ्या पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं नवं समीकरण पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मंत्रिमंडळ विस्तारात कोणतंही खातं मिळालं तर मी चांगलं काम करेल” – https://t.co/kuRprLP6LV @RealBacchuKadu
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
“माझ्या स्टाईलने मी या सरकारवर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही” – https://t.co/pjQQS21vza @MeNarayanRane @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है…- संजय राऊत – https://t.co/iqO5IeKRzo @rautsanjay61 @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019