मुंबई | राज्यात सध्या विविध मुद्द्यांनी वातावरण तापलेलं असताना अभिनेत्री केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
केतकीनं फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट केली होती यावरुन राष्ट्रवादीनं कमालीचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शरद पवारांवर केलेल्या या वादग्रस्त पोस्टविषयी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर तिला 18 तारखेपर्यंत कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.
केतकीच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केतकीला चांगलंच फटकारलं आहे.
कायदा योग्य ते काम करेल, मी काय बोलणार. एक तर मी केतकीला ओळखतही नाही. मात्र कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का? कुठल्या संस्कृतीत हे बसतं?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, यांचे आभार मानते त्यांनी अशा विकृतीच्या विरोधात भूमिका घेतली, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, शरद पवारांवर केलेल्या या वादग्रस्त पोस्टविषयी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर तिला कोठडी देखील सुनावण्यात आली आहे.
केतकीनं केलेल्या या आक्षेपार्ह पोस्टविषयी अनेक ठिकाणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिनेत्री केतकी चितळेला ‘इतक्या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
“बाळासाहेब ठाकरे असली होते मात्र उद्धव ठाकरे…”
“सकाळी 8 वाजता शपथविधी झाला, त्याला पहाट म्हणतात का?”
जगासमोर आणखी एक नवं संकट?; नासाने दिला ‘हा’ इशारा
“बाबरी मशीद पडली तेव्हा मी तिथं होता, तिथं एकही शिवसैनिक नव्हता”