मुंबई | मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी लोक, तर मुंबईत पैसाच शिल्लक रहाणार नाही. आणि मुंबईकडे असलेले देशाच्या आर्थिक राजधानीचे (Financial Capital) महत्व संपुष्टात येईल, असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलं होतं.त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व राजकारणी राज्यपालांवर तुटून पडले आहेत. त्यांनी राज्यपालांवर टीकांचा पाऊस पाडला आहे. आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील भाग घेतला आहे.
महाराष्ट्रात नागरिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा राज्यपालांचा कट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरुन हटवण्याची मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राज्यपाल (Governor of State) हे एक घटनात्मक पद आहे. त्याच्याबद्दल बोलणं गैर आहे. परंतु राज्यपाल सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होतो आहे, असंही राज्यपाल म्हणालेत.
विविधतेत एकात्मता (Unity in Diversity and Diversity in Unity) ही भारताची ओळख आहे. तरीसुद्धा समाजात तेढ निर्माण करण्याचे कट कारस्थान राज्यपाल गेले काही महिने सातत्याने करत आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात मीठाचा खडा टाकून कटूता वाढवण्याचा हा प्रकार आहे, असंही ते म्हणालेत.
कडक आणि कणखर शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली. तसेच आपण याबद्दल संसदेत (Parliament of India) आवाज उठवणार असल्याचं त्या म्हणाल्यात.
तसेच यावेळी त्यांनी राज्यपालांच्या या वक्तव्यात उपमुख्यमंत्री यांना देखील मध्ये खेचले आहे. दरवेळी उपलबद्ध असणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आता कुठे गेले. राज्यपालांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करावं, असं त्या म्हणाल्यात.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, महत्वाचं म्हणजे राज्यपाल ज्या राज्यातून येतात तिथे त्यांना परत पाठवलं पाहिजे. महाराष्ट्राबद्दल त्यांना असलेली असूया त्यांच्या या वक्तव्यातून जाहीर होते.
महत्वाच्या बातम्या –
“राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही, मी त्यांच्या विधानाचं समर्थन करतो”
“बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा”
‘कोश्यारींची होशियारी’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज ठाकरेंनी झापलं
मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढल्यानंतर इथे काहीच पैसा उरणार नाही- राज्यपाल
‘माझा तो हेतू नव्हता’, वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण