महापोर्टल तातडीने बंद करा; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून महापोर्टल बंद व्हावं, अशी राज्यातील तरूणांची मागणी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीत तसं आश्वासन देखील दिलं होतं. आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महापोर्टल तातडीने बंद करावं, अशी मागणी केली आहे.

शासकिय नोकरभरती करताना पारदर्शकता रहावी, ऑनलाईन अर्ज करता यावा, यासाठी महापोर्टल सुरू करण्यात आलं होतं. मात्र, या पोर्टलमुळे मदत होण्याऐवजी अनेक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी करण्यात होत होत्या. राज्यभरात ठिकठिकाणी महापोर्टलविरोधात आंदोलन झालं होतं.

मागील सरकारने सुरू केलेले हे महापोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच नोकरभरतीसाठी परिक्षा घेण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महापोर्टल विषयी सुप्रिया सुळे यांचं विधानसभेच्या काळातलं भाषण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी महापोर्टलला सक्षम पर्याय देण्यासंबंधी चर्चा केली.

महत्त्वाच्या बातम्या-