डोंबिवलीकरांसाठी सुप्रिया सुळेंनी संसदेत केली ‘ही’ मागणी

मुंबई | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. लोकलच्या संख्या वाढवण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी संसदेत केली आहे.

डोंबिवलीकडे जाणाऱ्या लोकलमधील गर्दीचा आणि गाड्यांच्या अनियमितपणाचा मुद्दा संसदेत मांडला. लोकसभेतील शून्य प्रहरामध्ये सुप्रिया सुळेंनी लोकलचा मुद्दा उपस्थित केला.

सुळेंनी यासंदर्भातील पत्र ट्विट करुन माहिती दिली. डोबिवलीकडे जाणाऱ्या आणि डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी संसदेत केली आहे.

डोंबिवली लोकलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त होणाऱ्या गर्दीचा आणि लोकल वेळापत्रकाचं पालन करण्यात होणाऱ्या दिरंगाईचा मुद्दा नियम 377 अंतर्गत उपस्थित केला आहे. डोंबिवलीकडे जाणाऱ्या आणि डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवण्याची मागणी केंद्राकडे केली आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

 

महत्त्वाच्या बातम्या-