राज ठाकरे यांची सुप्रिया सुळेंवर घणाघाती टीका, म्हणाले…

ठाणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्यात प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली होती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या.  खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. त्यावर राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी बोलायचं नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

संपलेल्या पक्षावर मी काय काय बोलणार, अशी टीका करण्यात आली. येऊन बघा. हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्यांना विझवणारा पक्ष आहे, असं जोरदार प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा निवडूण येणाऱ्या लोकांची मोळी आहे. त्याची रस्सी फक्त पवार साहेबांच्या हातात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांच्यावर टीका केली. तुमचे सीए यांच्यामुळे तुम्हाला आत जावं लागलं.  दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यावर पुन्हा यांचा शपथविधी झाला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

मी याच्या अगोदरही बोललो होतो. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो. अजित पवारांना तीनचार महिने कु असा आवाज ऐकू येत होता. यावेळी राज ठाकरे यांनी काही व्हिडीओ ऐकूण दाखवले आहेत.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.  लाऊड स्पीकर कशाला लावता आहात?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

लॉकडाऊन लावण्याच्या अगोदर मी बोललो होतो. मशिदीवरील भोंगे बंद झाले पाहिजेत. धर्म आपल्या घरामध्ये ठेवावा. मी याच्या आधीही बोललो. ऐकू नाही आलं. गुढीपाडव्याचा भोंगा ऐकू आला, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

मशिदीवरील भोंग्यांच्या संपुर्ण देशाला त्रास होत आहे. याच्यामध्ये धार्मिक विषय कुठे आहे?, तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे ती आम्हाला का ऐकवत आहात? असा सवाल त्यांनी केला.

तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देता. तुम्हाला सांगून कळत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शरद पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार, हे इंटेलिजन्सला कळलं कसं नाही?”

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

Kirit Somaiya: वादात अडकलेल्या किरीट सोमय्यांना आठवले गोपीनाथ मुंडे, म्हणाले…

अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘बाई-बुब्स-ब्रा’ पोस्टनंतर आता ‘लिंबाच्या शक्ती’ची पोस्ट चर्चेत!

“…हे असलं काही चालणार नाही”; सुशीलकुमार शिंदेंनी राज ठाकरेंना फटकारलं