महिलेच्या बाळंतपणात सुप्रिया सुळेंची मायेची ऊब, माहेरहून आईला आणण्यासाठी केली मदत

पुणे | बाळंतपणावेळी आपली आई जवळ असावी, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत अडकून पडलेल्या एका लेकीला मात्र तिची आई येऊ शकेल की नाही, अशी चिंता होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी मायेची ऊब देत त्यांची ही अपेक्षा पूर्ण केली आणि दोघी मायलेकींनी सुळे यांचे भरभरून आभार मानले आहेत.

वैष्णवी चांदेकर, असं या महिलेचं नाव आहे. त्या पुण्यात कात्रज येथे रहातात. गरोदरपणात त्यांना आठवा महिना सुरू होता आणि त्याचवेळी कोरोनामुळे देशभर टाळेबंदी लागू झाली. एकीकडे दिवस भरत चालले होते आणि दुसरीकडे ताळेबंदीची मुदत वाढत चालली होती.

आई माहेरी ओतूर येथे होत्या. पण त्यांना आपल्या लेकीकडे येणे शक्य नव्हते. त्यामुळे चांदेकर यांनी काही प्रयत्न करून पाहिले मात्र शक्य होत नव्हते. अखेर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत आपली ही अडचण कळवली. यानेतर सुप्रिया सुळे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून चांदेकर यांच्या आईंना ओतूरहून कात्रज येथे आणण्याबाबत सूचना केल्या

वैष्णवी चांदेकर यांची सुखरूप प्रसूती झाली असून त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. दोन्ही मुले आणि त्यांची स्वतःची प्रकृती उत्तम असून मायलेकरांना नुकतंच दवाखान्यातून घरी सोडण्यात आलं आहे. सुळे यांनीही पुन्हा एकदा मायलेकरांना शुभेच्छा दिल्या असून काळजी घेण्याबाबत सल्ला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शेतीसाठी केंद्र सरकारकडून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पॅकेजची घोषणा

-पावसाचं धुमशान… पाहा पावसाचे व्हिडीओ

-कोरोनाचा सामना करणाऱ्या भारताला वर्ल्ड बँकेकडून दिलासा; केली मोठ्या मदतीची घोषणा

-मुंबईवरुन लपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; पारनेरचे 200 जण क्वारंटाईन

-दारु पाजून महसूल मिळवण्यापेक्षा देवस्थानांचं सोनं सरकारनं व्याजानं घ्यावं- तृप्ती देसाई