शब्द जरा जपून वापरा; सुप्रिया सुळेंचा शेलारांना सल्ला

मुंबई | मुख्यमंत्रीपदाचा मान आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. मग पक्षातले नेते असो वा विरोधी पक्षातले नेते…. आशिष शेलार यांनी शब्द जरा जपून वापरले पाहिजेत, असा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर मराठा विद्यार्थी आंदोलकांची भेट घेण्यासाठी त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार यांची जीभ घसरली होती. राज्य काय तुझ्या बापाचं आहे काय? असा एकेरी शब्दात उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

दरम्यान, दिल्लीतल्या गोळीबारावरही सुप्रिया सुळे यांनी मत मांडलं. राजधानीत जर असे प्रकार होत असतील तर ते चिंताजनक आहेत, असं त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-“मी छोट्या आणि मोठ्या भावाच्या कात्रीत सापडलो होतो”

-हिंदुत्वाचं वचन मोडलं जात असेल तर मला असलं हिंदुत्व मला नको- मुख्यमंत्री

-“महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं त्यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह देखील ढोंगीच”

-सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद समजणार नाही- विक्रम गोखले

-“ठरल्याप्रमाणे सगळं झालं असतं तर आज मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो नसतो”