नवी दिल्ली : भाजप सरकारला मस्ती चढलीय आहे. झेपत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या राजधानी नवी दिल्लीत बोलत होत्या.
मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात चांगलाच पेटला आहे. महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
सत्तेवर येण्याआधी फडणवीस सरकार मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मोठमोठ्या बाता मारत होते. परंतु सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आणि धनगरांना आरक्षण मिळालं नाही, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, फडणवीस सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे, असा आरोपही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.