“मुख्यमंत्री महोदय, जनतेची कामं केल्याचा दावा करता तरी तुमच्यावर ही वेळ का येते?”

मुंबई : महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या युवती उपाध्यक्ष मनिषा काटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्थानबद्ध करण्यात आले. मनिषा, एक वर्षाच्या बाळाच्या आई आहेत. तरीही त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री महोदय, तुमचा जनतेची कामे केल्याचा दावा सत्य असेल तर अशी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्याची वेळ तुमच्यावर का येत आहे? सत्ताधारी अशी धरपकड तेव्हाच करतात, जेंव्हा त्यांच्याकडे आपण केलेल्या कामाबद्दल खरं सांगण्यासारखं काहीच नसतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

या साऱ्या प्रकारावर हा कसला महाराष्ट्र तुम्ही घडवित आहात?, असा संतप्त सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजपने राज्यात महाजनादेश यात्रा काढली आहे. गावागावात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधत आहेत. विरोधी पक्षांकडून मात्र मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेचं काळे झेंडे दाखवून तसेच विरोधात घोषणा देऊन स्वागत करण्यात येत आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली ट्विट-

महत्वाच्या बातम्या-

-“चंद्रकांत पाटील साधे आहेत; त्यांना पत्रकारांच्या गुगली कळत नाहीत”

-विधानसभा निवडणूक लढवणार का??? अशोक चव्हाण म्हणतात…

-बीडचं रुप झपाट्यानं बदलणार; जयदत्त क्षीरसागरांचा विश्वास

-“राज ठाकरेंना कोणताच उद्योगधंदा नाही”

-“राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीमुळे शरद पवार जखमी”