मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालीसावरून राजकारण तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला होता.
त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी सद्यस्थितीतील राजकारणावर जोरदार टीका केली आहे. धार्मिक गोष्टी उंबऱ्याच्या आत राहिल्या पाहिजेत, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.
मला खासदार म्हणून माझ्या मतदार संघात पाणी, शिक्षण, रस्ते, अंगणवाडी अशा विषयांवर कोणी प्रश्न विचारत नाही. महत्त्वाचे नसलेले विषय चर्चेसाठी आणले जातात. त्या दैनिक लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या.
माझे वडिल अजिबात मंदिरात जात नाहीत हे खरं नाही. ते फक्त गाजावाजा करत नाहीत. माझे आईवडिल दोघेही धार्मिक कर्मकांडात नसतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी हनुमान चालीसा येत नसल्याचं सांगितलं आहे. मला हनुमान चालीसा म्हणता येत नाही हे मी प्रांजळपणे कबुल करते. मात्र, ज्यांना हनुमान चालीसा म्हणायची त्यांचा मी आदर करते, असं त्यांनी म्हटलं आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट धरला होता. त्यावरून इतरांच्या घराबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणणं योग्य नाही, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
दरम्यान, शरद पवार 1972 पासून सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात अनेकवेळा गेले आणि विकासकामांना मदत केली. त्याचा त्यांनी कधीही बाऊ केला नाही. ती पिढी कर्मयोगी होती, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आत्ताची मोठी बातमी! तब्बल 18 दिवसानंतर गुणरत्न सदावर्ते जेलबाहेर, सुटकेनंतर म्हणाले…
Elon Musk ट्विटरचे नवे मालक झाल्यानंतर CEO पराग अग्रवालने दिला ‘हा’ गंभीर इशारा
“मी दहावीत दोनदा नापास झालो पण…”, नागराज मंजुळेंची पोस्ट चर्चेत
अनिल देशमुखांना दिलासा मिळणार?, चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर
‘साहेबांसमोर सांगतोय, मला विक्रम काळेंची भीती वाटते’; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी