“नेते भाजपत आल्यावर कारवाया थांबतात कशा?”

नवी दिल्ली | रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकरांवर (Rashmi Thackeray Brother Shridhar Patankar) ईडीनं कारवाई केली. या कारवाईवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. या प्रकणावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या विरोधातील लोकांवर आरोप केले जातात. हेच लोक भाजपत आले की त्यांच्यावरील आरोप विरघळतात, हे असं का होतं? त्यांच्यावरील कारवाया कशा थांबतात, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

आमचे नेते नवाब मलिक म्हणत होते, त्याप्रमाणेच हा सगळा फर्जीवाडा आहे. कुणावर टीका करेपर्यंत अनेक नेते इथे क्लीन असतात. पण कुणी विरोधात बोललं की त्यावर कारवाया होतात, अशी सगळी गंमत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच विनम्रपणे विचारणार आहे, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचे 55 वर्षांचे ऋणानुबंध आहे. बाळासाहेब आणि पवार साहेबांचेही मैत्री आणि आदराचे संबंध आहेत. पुढील 100 वर्षेही राहतील, असं त्यांनी म्हटलंय.

कोणाच्याही घरात अन्याय होतो, तेव्हा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि यापुढेही असतील, असंही त्यांनी सांगितलं.

देश सुधारणार असतील तर त्यांचं मनापासून स्वागत करते. मी स्वतः त्यांचा जयघोष करते. पण चेरीपिकिंग करायचं असेल… सिलेक्टिव्ह कारवाई करायची असेल तर ये नही हो सकता, असं त्या म्हणाल्यात.

तुम्हाला जर ईडीची रेड करायची आहे तर सगळ्याच पक्षांमध्ये करा. बीजेपीवाल्यांवर जेव्हा आरोप होतात, त्यानंतर ते बीजेपीत येतात. मग त्यांची कारवाई कशी थांबते. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी योग्य असावं, अशीच माझी अपेक्षा आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या- 

The Kashmir Files वर शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

Corona Restriction: मोठी बातमी! केंद्राने कोरोना निर्बंध हटवले; फक्त ‘या’ 2 गोष्टी पाळा 

Vaccine: पुण्यातील कंपनीने ‘चोरी’ करून लस बनवली?, तब्बल 7200 कोटींचा खटला दाखल

एसटी कर्मचाऱ्यांना धक्का! मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

“उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात संबंध काय?”