मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.
लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधलं. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. या मुद्द्यावरून राजकारण रंगायला सुरूवात झाली आहे.
फडणवीसांच्या भाषणानंतर नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा करण्यात आली. अजित पवारांना संधी न दिल्याने मोदीही आश्चर्यचकीत झाले. यावेळी मोदींनी अजित पवारांकडे हात दाखवून विचारणाही केली परंतू अजित पवारांना भाषणाची संधी मिळाली नाही.
अजित पवारांना मुद्दामुन डावलल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेत्यांना भाषण करू देता पण आमच्या नेत्याला भाषण करू देत नाही. ही दडपशाही असून आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा घणाघात सुप्रिया सुळेंनी केला आहे.
दरम्यान, फडणवीसांना भाषणाची संधी देणे हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
“पंकजा मुंडेंचा राजकीय एनकाऊंटर करण्याचा भाजपमधून प्रयत्न होतोय”
पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांच्या विमानतळावरील ‘त्या’ फोटोची का होतेय चर्चा?
पालखी मार्गाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले…
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत”
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुण्यात आगमन; विमानतळावर अजित पवार, फडणवीसांकडून स्वागत