“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला”

पुणे | राज्याच्या राजकारणात सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे या एकाच नावाची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यानंतर ठाण्यात सभा घेत महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होतं.

मशीदींवरील भोंग्यांचा विषय राज्याच्या राजकारणात नवा नाही. पण राज ठाकरेंनी आता या विषयावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यात गोंधळ वाढला आहे.

आता राज ठाकरेंनी औरंगाबादला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सभा घेण्याची घोषणा केली आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

औरंगाबाद येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंवर शेलक्या शब्दात टीका केल्याचं पहायला मिळालं आहे.

राज ठाकरे म्हणजे मनोरंजनाचा कार्यक्रम असतो. थोडा एन्टरटेंन्मेंट होवू द्या ना, सगळं सिरीयस कशाला पाहीजे, नेहमीच दुरदर्शन कशाला पाहीजे, कधीतर इतर चॅनेलही पाहा ना, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

एका कार्यकर्त्यांनं राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत यावर तुम्हाला काय वाटतं असं विचारताच सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना जबरदस्त टोले लगावले आहेत.

तो येईल, भाषण देऊन निघून जाईल, तुम्ही तुमचे काम करा ना. इतकं महत्त्व देताच तुम्ही कशाला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. परिणामी राज्यात वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची सभा औरंगाबादमध्ये ज्या मैदानावर गाजली होती. त्याच मैदानावर राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका

“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”

“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे” 

मोठी बातमी! लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!

“…म्हणून चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रात थांबावं”