…तर मला विजय चौकात फाशी द्या- सुप्रिया सुळे

नवी दिल्ली | नुकतंच ईडीने मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई करत त्यांची 6.45 कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरेंना आव्हान असल्याचं सांगितलं जातं आहे.

एकीकडे राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन वाद सुरूये तर आज मुख्यमंत्र्यांनीही यावरुन भाजपवर टीका केली आहे. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे.

ईडी आणि सीबीआय यांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभारतोय. या संस्था जर स्वतंत्र असतील तर महाराष्ट्रातील कोणता नेता तुरुंगात जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधीच कसं समजतं? भाजप नेते याबद्दल आधीच कसं ट्वीट करतात?, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला.

ईडी आणि सीबीआय यांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभारतोय. या संस्था जर स्वतंत्र असतील तर भाजपचे काही नेते या संस्थांच्या धाडीच्या आधीच त्याची माहिती सोशल मीडियावरून कशी काय देतात? यासंबंधी माहिती लीक होते, त्याबद्दल केंद्र सरकारने खुलासा करावा, असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.

मी जर काही चूक केली असेल तर मला विजय चौकात फाशी द्या, असं खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या.

दरम्यान, अमरावीतच्या खासदार नवनीत राणा यांनीही संसदेत पेनड्राईव्ह सादर करत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आरोपांनी संसदेतही वातावरण तापल्याचं दिसून आलं.

कसभा अध्यक्षांनी या पेनड्राईव्हची आणि आरोपांची दखल घेतली असल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट 

पोस्टाची भन्नाट योजना; तुमचे पैसे होतील दुप्पट

अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना! 

आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये वाद, संजू सॅमसन भडकला