‘उद्धव ठाकरेंना दुखावणं म्हणजे बाळासाहेबांना दुखावण्यासारखं’ -सुप्रिया सुळे

पुणे | अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं व राज्यात शिंदे सरकार सत्तेत आलं. एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडखोरीने संपूर्ण राज्याचं राजकारण हदरवून सोडलं.

शिवसेनेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच सेनेत एवढं मोठं बंड पाहायला मिळालं. तर शिंदे सरकार स्थापन झाल्यापासूनच विरोधकांनी टीकेची तोफ डागली आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. पुण्यातील प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल मंदिराला भेट दिल्यानंतर सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला.

बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवला होता. मात्र, त्यांच्या विरोधातच बंडखोरी करून त्यांना दुखावलं जात आहे. उद्धव ठाकरेंना दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावण्यासारखे आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी बंडखोर आमदारांना उद्देशून केली आहे.

राज्यात सध्या भीषण परिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत आहे. परंतू हे सरकार एका विमानातून उतरतंय आणि दुसऱ्या विमानात बसतंय, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अडीच हजारांची दाढी आणि कटींग करतंय. त्यांना शेतकऱ्यांशी काही देणं-घेणं नाही. यात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर हे सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळेंनी केला आहे.

दरम्यान, लोक सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून आले. भारत दर्शन करून आले, असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. हे सरकार अस्थिर आहे पण खरं रूप लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

देवेंद्र फडणवीसांना टॅग करत संजय राऊतांचं सूचक ट्विट, म्हणाले…

राज ठाकरेंचं मनसे पदाधिकाऱ्यांना पत्र, दिल्या महत्त्वाच्या सूचना

शिवसेना खासदारांमध्ये फूट?, संजय राऊत आणि खासदारांमध्ये ‘या’ मुद्द्यावरून जुंपली

उद्धव ठाकरेंचा कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका बंडखोर आमदारांची हकालपट्टी