“बायको जेवढी फूगत नसेल तेवढे…” – सुप्रिया सुळे

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण काही दिवस खाते वाटप राहिले होते. ते सुद्धा झाले आणि शिंदे यांच्या वाट्याला दुय्यम स्वरुपाची आणि पर्यायाने हलकी मंत्रिपदे आली.

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या भाजप गटाला अवजड आणि महत्वाची मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या गटातील अनेक आमदार नाराज असल्याचे म्हंटले जात आहे.

आता त्यांच्या या नाराजीनाट्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेे (Suprya Sule) यांनी त्यांच्यावर मिश्किल टीका केली आहे. घरातील बायको एवढी रुसत नसेल तेवढे हे मंत्री रुसत आहेत, असे सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे या मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षांनी निवडणुका लागतील. पण सध्या भाजप आणि शिंदे यांचे रुसवे फुगवे सुरु आहेत, असे देखील सुळे म्हणाल्या.

मंत्रिपदे मिळाल्याने देखील कमी महत्वाची खाती मिळाली म्हणून अनेकजण नाराज आहेत. यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar), रोजगार हमी याेजनेवरील संदीपान भुमरे (Sandeepan Bhumare) आणि सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.

पहिल्या टप्प्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपली नाराजी उघड केली होती. तसेच औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मंत्रिपदासाठी बऱ्याच टाचा झिजविल्या पण त्यांना खाते काही मिळू शकले नाही, त्यामुळे ते देखील रुसले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

“सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला?” अजित पवारांची आक्रमक पत्रकार परिषद, वाचा सविस्तर

देवेद्र फडणवीसांचा आघाडी सरकारवर गंभीर आरोप

‘जन गण मन’ ऐवजी आता ‘या’ गीताला राष्ट्रगीत म्हणून घोषित करा – हिंदू महासंघ

काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळणार, जाणून घ्या कोण कोण आहे शर्यतीत?

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, चिन्हाबाब एन. व्हि. रमणांचा महत्वपूर्ण निर्णय