मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय वाद चालू आहे. संसदेत मोदींनी कोरोनाच्या पहिल्या लाटेसाठी ठाकरे सरकारला दोषी ठरवल्यानं आता त्यावरून राजकारण तापलेलं आहे.
भाजप विरोधात राज्यभरात काॅंग्रेसनं जोरदार आंदोलनं केली आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन कराताना काॅंग्रेस प्रवक्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
काॅंग्रेसच्या आंदोलनानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावरून राज्यात चर्चांना उधाण आलं असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जोरदार टोलेबाजी केली आहे.
सुप्रिया सुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोघेही सकाळी एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली आहे.
तुम्हाला तीन वाजायच्या आत जे करायचं आहे ते करून घ्या कारण तीन वाजल्यानंतर संजय राऊत हे तुमच्यावर आरोप करणार आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. दादा आत्ताच आपण आपली पब्लिसिटी करूत कारण तीननंतर संजय राऊत सिक्सर मारणार आहेत, असंही सुळे म्हणाल्या आहेत.
भाजपच्या एकाही नेत्याला आतापर्यंत चौकशीला सामोरं जावं लागलं नाही. परिणामी कोण किती पाण्यात आहे ते कळत आहे, अशी टीकाही सुळे यांनी भाजपवर केली आहे.
ईडीच्या सततच्या कारवाईवरून राज्यात मोठा संघर्ष उद्भवला आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, अशी टीका राज्य सरकार करत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारवर काय टीका करणार याकडं सध्या सर्वाचं लक्ष लागलं आहे. राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवसेना भवनवर जमा होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईत ईडीची मोठी कारवाई! कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधितांवर छापेमारी
‘या’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 66 लाख
‘विश्वासात आणि श्वासात तू आहेस….’; अमृता फडणवीसांनी केली नव्या गाण्याची घोषणा
केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा
“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”